Posts

Showing posts from January, 2017

कशाला हवय स्वातंत्र्य...?🇮🇳🇮🇳🇮🇳

Image
नमस्कार, काही दिवसापूर्वी माझे मित्र चिन्या 🤓आणि ओंक्यासोबत😎 whatsapp वर बोलणे झाले, अहो तेच ते ७ वर्षांपूर्वी अपघाती भेटलेले आणि मनमोकळ्या स्वभावाचे माझे अट्टल लंगोटी यार👬, अहो विसरलात त्याना? असो, तर भेटू भेटू म्हणून ७ वर्षे झाली म्हणून Chat वर तरी का होईना बोलणे झाले आणि सुट्टीच्या दिवशी भेटायचे ठरले. तिथेच नेहमीच्या कट्ट्यावर, आवडत्या विषयांबरोबर आणि एक पेला चाय☕ के साथ.. तर मग दिवस ठरला २६ जानेवारी ठिकाण रमणबाग चौक, आणि सकाळी एकदाची भेट झाली. झाली मनमोकळया संवादाला सुरुवात, जसे काही आम्ही त्या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु सारखे तुरुंगातून सुटून शेवटचे भेटलो अगदी तसाच विषय रंगला. चहा घेता घेता एका बाजूला देशभक्ती गाणी, नागरिकांचे झेन्डांवंदन, कचरा वेचकांचे स्वच्छ भारताचे काम, डोंबारी खेळ करून दाखवणारा छोटू, आणि इतर घडामोडी चालू होत्या. त्यात आम्ही मोठ मोठ्या आवाजात हसत खेळत गप्पा मारत होतो आणि सुट्टीचा पुरेपुर आस्वाद एक कप चाय के साथ घेत होतो. बोलता बोलता त्या छोटू कडे विषय गेला. ७ वर्षापूर्वीदेखील हा छोटू डोंबारी खेळ करून दाखवत होता आणि आत्ता देखील, फरक इतकाच कि मागे त्या...