कशाला हवय स्वातंत्र्य...?🇮🇳🇮🇳🇮🇳
नमस्कार, काही दिवसापूर्वी माझे मित्र चिन्या 🤓आणि ओंक्यासोबत😎 whatsapp वर बोलणे झाले, अहो तेच ते ७ वर्षांपूर्वी अपघाती भेटलेले आणि मनमोकळ्या स्वभावाचे माझे अट्टल लंगोटी यार👬, अहो विसरलात त्याना? असो, तर भेटू भेटू म्हणून ७ वर्षे झाली म्हणून Chat वर तरी का होईना बोलणे झाले आणि सुट्टीच्या दिवशी भेटायचे ठरले. तिथेच नेहमीच्या कट्ट्यावर, आवडत्या विषयांबरोबर आणि एक पेला चाय☕ के साथ..
तर मग दिवस ठरला २६ जानेवारी ठिकाण रमणबाग चौक, आणि सकाळी एकदाची भेट झाली. झाली मनमोकळया संवादाला सुरुवात, जसे काही आम्ही त्या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु सारखे तुरुंगातून सुटून शेवटचे भेटलो अगदी तसाच विषय रंगला. चहा घेता घेता एका बाजूला देशभक्ती गाणी, नागरिकांचे झेन्डांवंदन, कचरा वेचकांचे स्वच्छ भारताचे काम, डोंबारी खेळ करून दाखवणारा छोटू, आणि इतर घडामोडी चालू होत्या. त्यात आम्ही मोठ मोठ्या आवाजात हसत खेळत गप्पा मारत होतो आणि सुट्टीचा पुरेपुर आस्वाद एक कप चाय के साथ घेत होतो.
बोलता बोलता त्या छोटू कडे विषय गेला. ७ वर्षापूर्वीदेखील हा छोटू डोंबारी खेळ करून दाखवत होता आणि आत्ता देखील, फरक इतकाच कि मागे त्याचे आई वडील त्याच्या सोबत होते आता त्याची पत्नी आणि त्याचा एक छोटा मुलगा. का? इतके वर्ष झाले पण हा अजून याच परीस्थितीत का जगत आहे? प्रजा सत्ताक असून देखील त्याच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नाही का? त्या कचरा वेचाकांना सुद्धा सुट्टी का नाही? त्यांनी थोडी तो कचरा केलाय? मग का नाही त्यांना पण समान वागणूक? क्षणात शांतता पसरली. कारण अश्या प्रश्नावर उत्तरेच नव्हती.
तेवढ्यात बाजूच्या देशभक्ती गाण्यातून एक गाणे लागले. “हर करम अपना करेंगे तेरे लिये, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिये |” आणि क्षणात त्या सर्व क्रांतिकारक, समाजसुधारकांचे स्मरण झाले आणि प्रश्न पडला मग काय करायचं या स्वातंत्र्याचं? कशाला हवाय स्वातंत्र? सर्वांना समान अधिकाराने समान हक्कांची वागणूक मिळावी म्हणून स्वातंत्र्य मिळाले कि इंग्रजांच्या अत्याचाराखाली दडपलेला समाजाला स्वकीयांच्या अत्याचाराखाली पुन्हा दडपण्यासाठी स्वातंत्र्य मिळाले. प्रश्न गंभीर आहे फक्त एक पेला चाय के साथ नाही संपणार त्याला चहा पिणारर्यांचा संवेदनशील तरुणाईचा मुलुख लागणार...
🇮🇳जय भारत, भारत माता की जय🇮🇳
(टीप- आपण सर्व संवेदनशील आहातच त्यामुळे आता प्रश्न उरतो तो अश्या विषयांवर चहा पिण्याचा आणि प्रजासत्ताक दिनी देशहित कामाच्या संकल्प करण्याचा)
अतिशय सुंदर आणि समर्पक लेखन शुभम ��������������
ReplyDeleteधन्यवाद सर 😄💐🇮🇳
ReplyDeleteमस्त शुभम दादा...नक्कीच संवेदनशील तरुणांची गरज आपल्या देशाला, समाजाला आहेच..अश्या मित्रांचे संघटन हवेच...��������������������
ReplyDeleteशुभम मस्त 👌
ReplyDeleteGreat job Shubham...
DeleteThanks for realising all of us..