Posts

Showing posts from July, 2018

बघतो.. शिक्षकांशी बोलून!!

आज मी एका आकाशला बदल स्वीकारताना आणि स्वतःला बदलताना अनुभवलंय, हो खरच.. सांगतो नेमके काय झाले ते. एका प्रवाश्याला लिफ्ट देण्याच्या निमित्ताने का होईना पण त्याला सोडायचे म्हणून संविधान चौक, वानवडीत थांबलो. तेवढ्यात रस्त्याच्या बाजूला एक आई आणि तिचा मुलगा, गाडीच्या चाकाजवळील गार्डला कव्हर लावताना दिसले आणि माझ्याही गाडीला लावावे म्हणून बोललो. तिथे मी भेटलो आकाश आणि त्याच्या कष्टाळू आईला. नेहमीच्या सवयीनुसार काम करताना मी त्याला त्याचे नाव विचारले? आणि लगेचच पुढचा सवाल केला 'शाळेत जातोस का?'. तो म्हणाला मला सर्व काही येते म्हणून शिक्षकांनी मला शाळेत घेतले नाही आणि मी देखील त्यांना परत विचारले नाही. हे बोलल्यावर मला समजले त्याला नक्की काय म्हणायचे होते ते पण तितक्यात तो म्हणाला 'माझ्या वयाच्या इतर मुलांना शाळेत जाताना बघितले की मलाही शाळेत जावे असे वाटते, पण नाही जात.' बोलता बोलता मी लगेचच त्याला बोलून गेलो, 'एकदा जेवलो की भूक भागते का?' त्याचा चेहरा आश्चर्यचकित दिसला, कदाचित त्याला ते उदाहरण पटले असावे, म्हणून मी त्याला आणखी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,...