Posts

Showing posts from March, 2024

स्व-रूपदर्शन महाशिबिर सेवेकरी निर्माणाचा महायज्ञ

Image
परिसरातल्या अणुरेणूतुन अविरत वेचुनी तेजाचे कण, रसगंधाशी समरस होऊनि हृदयकमल फुलवावे,  विकसित व्हावे अर्पित होऊनि जावे ।। स्व. किशाभाऊ आणि त्यांच्या सवंगड्यांना वर्धिनीचा हा वटवृक्ष उभा करताना कधी पाहिले नव्हते, पण त्यांनी घडविलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सहवासातून त्यांच्या संस्कारांची, सत्कार्याची आणि समर्पणाच्या ऊर्जेची प्रचिती नेहमीच अनुभवायला येत होती. निस्वार्थ निष्काम कर्मयोग या शब्दांचा प्रत्यक्ष अनुभव देणारे अनेक उपक्रम वर्धिनीच्या सहवासात होत असतात. त्यापैकीच आयुष्यातील अविस्मरणीय उपक्रम म्हणजे स्व-रूपदर्शन महाशिबिर, जिथे लहानांपासून वृध्द कोणत्याही पदाचा, विचाराचा, मनाचा भेद न बाळगता सह कुटुंब नांदत होती. या शिबिराचा महाशिबिर प्रमुख म्हणून काम करण्याची संधी वर्धिनी आणि देवाने दिली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. शिबिराविषयी सहवास, शिक्षण, संस्कार, सेवा, संघटन, समर्पण या आयामांमध्ये मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न.   सहवास शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप,  शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी. रयतेचा राजा असे प्रेरणादायी चरित्र प्रत्यक्ष जगण्यासाठी शिबिराची नि...