प्यादा..

प्यादा.. (टीप - हि कविता काल्पनिक आहे, माझ्याशी संबंध नाही) बधिरतेच्या दुनियेतला मी आहे प्यादा, इथे कुणी राजा, कुणी उंट, पण मी आपला साधा। कुणी चाले सरळ, तर कुणी तिरपे पण मी चाले 1 कदम हा एकच वादा, ना थोडा ना कम ना उससे ज्यादा, बधिरतेच्या दुनियेतला मी आहे प्यादा, इथे कुणी राजा, कुणी उंट, पण मी आपला साधा। कुणा वाटे भीती कुना वाटे शक्ती, मला गमावल्या वाचून कोणास वाटे किती, तरीही ना ठरे मी निरर्थक ना टाकाऊ रीती, बधिरतेच्या दुनियेतला मी आहे प्यादा, इथे कुणी राजा, कुणी उंट, पण मी आपला साधा। खरंच आहे का हि दुनिया इतकी बधिर, इथे कोणाला ना कोनावाचून राहे धीर, प्याद्याची कसली चूक दुनिया ला हवेत वझीर, मग इथे प्रश्नच उरत नाही कोणी असल्याचा आधा, बधिरतेच्या दुनियेतला मी आहे प्यादा, इथे कुणी राजा, कुणी उंट, पण मी आपला साधा। शुभम जगताप.