देता का?
देता का?
मला न मिळाले क्षण त्या दोघा जीवांचे,
वयोवृद्ध पण मनमोकळ्या स्वावलंबी मनाचे,
त्या कळवल्या आजीआजोबा च्या मूर्तीचे,
नातू म्हणून जगण्यास न लाभलेल्या स्मृतीचे,
नवनिर्मितीने निर्माण केलेल्या दिव्य दृष्टीचे,
निश्चय, विश्वास, नि अपार कष्टाच्या सृजन सृष्टीचे,
देता का कोणी मज क्षण त्या अमूल्य जीवाचे,
हसऱ्या पण दोघात तिसऱ्या निरागस मनाचे।
का कळेना का दुनिया होते इतकी भकास,
राहतात कोंडी सोडोनि दोघांसी वृद्धाश्रमास,
कारे तो बनतो इतका निष्ठुर मिळोनि धनास,
विसरुनी जातो आपल्या माता पित्याच्या श्रमास,
दे दान त्या दोन जीवास देवा माझ्या स्वरूपाचे,
मिळो मजदेखील लाभ त्या निर्विकार क्षणाचे,
देता का कोणी मज क्षण त्या अमूल्य जीवाचे,
हसऱ्या पण दोघात तिसऱ्या निरागस मनाचे।
-शुभम जगताप
Comments
Post a Comment