सहवास


सहवास

एवलीश्या रूपाने जन्मास आलो,
स्वप्न रुपी जगास एकरूप झालो,
देहस्वरूपी लाभले आम्हास भाग्य रे,
अखंड निस्वार्थ निर्मळ माता पितांचा सहवास रे,
दे भाग्य सदा देवा सतत कर्म करविण्या,
या दुनियेत रमण्या असाच चिरंतन सहवास लाभो।

चिखलात उमलते दुर्मिळ असे कमळ,
तरी असते सर्व परिस्थितीत ते निर्मळ,
वासरू वाचून गाई नेहमीच प्रेमाची उपाशी,
पंखावाचून कसा उडेल तो पक्षी आकाशी,
जीवन जगण्या लागते मणी उत्कट भाव,
संकटांवर मात करण्या नेहमी स्वतःशीच धाव।

त्याला नि मला दोघांना हि मिळे सहवास,
त्याचा योग्य वापर करी त्यास प्रयत्नांची कास,
नीती, कर्म आणि अखंड कृतीचा विश्वास,
घे माणसा मोकळ्या जीवनाचा प्रत्येक श्वास,
अडचणी, अपयशापोटी होऊ नकोस तू निराश,
प्रेमळ सहवासातूनच मिळेल माणुसकीचा ध्यास।

-शुभम जगताप


Comments

Popular posts from this blog

फायद्याचे बोला...।🙈🙉🙊

मॉडर्न चाणक्यनीती

शिक्षणाच्या आई-बाबा-चालक-मालकाचा घो...