अहो चहावाले...

अहो चहावाले... कशाला त्रास देताय या अजाण बेलगाम जनतेला, लाखोंच्या मालक मजदूर स्वभावाने अनैतिक घनतेला, आज काल कोणी पण उठतोय आणि आपला देशभक्तीचा शिक्का तुम्हाला बदनाम करून राखतोय...अहो चहावाले... तुम्ही भाषणे देता बोलून दोस्तहो-देशभक्तहो..!, आम्ही मात्र आरोळतो 'भाई तुम देर दुरुस्त रहो।', तुम्ही कशाला उद्याची उधाण स्वप्न बरळता, सध्याचा तरुण स्वतःला व्यसनांच्या गर्दीत दिसतो खिदळता, देशाचा काय भलं ते तुमचं तूम्ही बघा, आम्हाला आमच्या मनोरंजनाचे देऊन तूम्ही कसेही जगा, कशाला देशाची सुख दुःखे गाता वाया "मन की बात", आम्ही झोपतो उशाशी तूम्ही जागा दिवस रात, अहो देशाच्या संरक्षणाचे काम करत असतील शिपाई, आमच्यात नाही ताकद देशातील तरुण सळसळते रक्त आटत जाई, आमच्या वेदना तुम्हाला काय कळणार, तुमच्या वेदनांची किंमत आम्ही मात्र तुम्हाला ठेचून वगळणार, अहो चहावाले... अहो आमच्या शेतकरी बापाची आम्ही पुण्यवान लेकरे, लाखोंचा सूट घालुन त्याच्यासाठी तुम्हीमात्र अहोरात्र घाम गाळीत फिरे, अहो आम्ही आपले सुखी आहोत 4 पायांच्या खुर्चीत, देशापेक्षा जास्त महत्त्वाच्या परश्या आण...