क्षणभर विश्रांती
राबती रानेवने अन् हिंडती नाना दुकाने
आसरा कोणास ओला, न कोणास आसने,
डुलतात छत्रे अनेक, अन्नवाचून राहती
मिळू दे तयासी देवा, मायाळू विश्रांती।
दिवस हा अंधारवाणा, तरी रात्र गोंजारती
पोरक्या माथ्यावरूनी, हात कोणी कुरुवाळती
आज न पाही कोणी तयांसी, लेकरे ही दुभती
मिळू दे तयासी देवा, अनोळखी विश्रांती।
लाखो मने असती तुपाशी, कोणी राहती उपाशी
असती अहंम् तेचे दासी, सडती मनाच्या उंबराशी
संवेदना तयांच्या दाहती, वेदना रक्ताळूनी वाहती
आज लोकांस कळू दे, त्या चिमुकल्याची विरह ती
मिळू दे तयासी देवा, क्षणभर विश्रांती।
-शुभम जगताप
मस्त लिहिलं आहेस शुभम ।
ReplyDeleteThanks Onkar
ReplyDelete