अहो चहावाले...

अहो चहावाले...

कशाला त्रास देताय या अजाण बेलगाम जनतेला,
लाखोंच्या मालक मजदूर स्वभावाने अनैतिक घनतेला,
आज काल कोणी पण उठतोय आणि
आपला देशभक्तीचा शिक्का तुम्हाला बदनाम करून राखतोय...अहो चहावाले...

तुम्ही भाषणे देता बोलून दोस्तहो-देशभक्तहो..!,
आम्ही मात्र आरोळतो 'भाई तुम देर दुरुस्त रहो।',
तुम्ही कशाला उद्याची उधाण स्वप्न बरळता,
सध्याचा तरुण स्वतःला व्यसनांच्या गर्दीत दिसतो खिदळता,
देशाचा काय भलं ते तुमचं तूम्ही बघा,
आम्हाला आमच्या मनोरंजनाचे देऊन तूम्ही कसेही जगा,
कशाला देशाची सुख दुःखे गाता वाया "मन की बात",
आम्ही झोपतो उशाशी तूम्ही जागा दिवस रात,
अहो देशाच्या संरक्षणाचे काम करत असतील शिपाई,
आमच्यात नाही ताकद देशातील तरुण सळसळते रक्त आटत जाई,
आमच्या वेदना तुम्हाला काय कळणार,
तुमच्या वेदनांची किंमत आम्ही मात्र तुम्हाला ठेचून वगळणार,
अहो चहावाले...

अहो आमच्या शेतकरी बापाची आम्ही पुण्यवान लेकरे,
लाखोंचा सूट घालुन त्याच्यासाठी तुम्हीमात्र अहोरात्र घाम गाळीत फिरे,
अहो आम्ही आपले सुखी आहोत 4 पायांच्या खुर्चीत,
देशापेक्षा जास्त महत्त्वाच्या परश्या आणि प्रेमाळू आर्चित,
त्यामुळे आमच्या शिक्षणाची होत आहे पंचाईत,
देशाचं ब्रँडिंग करून कशाला दाखवता छाती 56 इंचीत,
अहो नको आम्हाला देश हजारो वर्षे अखंडतेच्या इतिहासाचा,
आमच्या पराक्रमी थोर वारस महापुरुषांच्या पावन भूमीचा,
जगू द्या आम्हाला आमच्या समाजाच्या भल्याने,
आम्हाला काय पडले आहे तूम्ही राष्ट्र हिताने झिजल्याने,
अहो चहावाले...


अहो आम्ही देतो तुम्हाला शिव्या देऊन आमच्या चर्चांना विराम,
तुमच्या विदेश दोऱ्याच्या धिक्कार करून खातो ब्रेड बटर आणि जॅम,
अजूनपण समाज विसरून करत नाही या राष्ट्रध्वजाला सलाम,
कसे तयार होणार आमच्यातून आंबेडकर आणि लाखो कलाम,
सांगतो आहे ना आम्हाला नकोय रक्तरंजित स्वातंत्र्य,
व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी घोषणा देऊन थकत नाही स्वरयंत्र,
अहो कशाला देशाच्या तरुणांना भारतात काम करा म्हणता,
रिकामटेकडी धूर सोडत गल्ली गल्लीत उत्सव साजरा करती मोकार जनता,
दाखवलेस खरे देशासाठी स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघण्याचे,
देशाला जातीअंताच्या गुलामगिरीतून मुक्त सुजलाम सुफलाम फुलण्याचे,
आम्ही देणार राजकारण धूर्त आहे बोलून देशकार्याला दुरावा,
आम्ही बाळगू जाती धर्म आम्हाला कोण विचारतोय देशनिष्ठ असल्याचा पुरावा,
अहो चहावाले...

नको नवे तंत्र आणि विद्या 'नो स्किलड' भाराने साऱ्या विद्युत मशाली विझल्या,
तुमच्या विरोधी लेखन करून आमच्या स्वाभिमानी लेखणी झिजल्या,
आमच्या कष्टाच्या भाजणीवर अशिक्षित राजकारण्यांच्या पोळ्या मात्र शिजल्या,
मागास समाजाच्या 'भावना' होरपळणाऱ्या दुष्काळात चिंब भिजल्या,
आमच्या अंधाऱ्या आयुष्यातील करुन कहाण्या फक्त हाऊसफुल गाजल्या,
तुम्हाला अयशस्वी करण्याच्या शोधात उत्तुंग शिखरांच्या वाटचाली अधुऱ्या राहिल्या,
सारून बाजूला रंजले गांजले आम्ही आमची दुःखे उघड्या बाजारी विकल्या,
तुमच्या नावाने दगड विटा फोडणे आता बस झाले,
अहो चहावाले...

आता आमच्या स्वप्नांचा भारत करु उभा लावून खांद्याला खांदा भरून नवा दम,
आता एकच मंत्र जन्मभर विजयघोष... वंदे मातरम...!

              -शुभम जगताप





Comments

Popular posts from this blog

फायद्याचे बोला...।🙈🙉🙊

मॉडर्न चाणक्यनीती

शिक्षणाच्या आई-बाबा-चालक-मालकाचा घो...