मॉडर्न चाणक्यनीती
आज कालच्या जगात माणसं इतकी हुशार आणि चाणाक्ष झालेली आहेत कि त्यांनी चाणक्य नीतीचा नवा अध्याय जगाला ज्ञात करावयास सुरुवात केली. अशा प्रकारचा लेख का तर समाज हा कशाप्रकारे जगतिकीकरणाच्या दृष्टीने बहुआयामी आहे, आणि यामध्ये सामान्य माणुस कशाप्रकारे आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी भौतिक जगाचा उपभोग घेतोय आणि शिकार होतोय, या गोष्टीची खंत मनाला वाटली म्हणून मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. मदत... आजकालाच्या जगात मदत घेणं आणि देणं इतकं महाग आणि धोकादायक झालाय कि दिलेली मदत परतफेड करणार्याला शोधायला इंटेलिजन्स एजन्सी ची मदत घ्यावी लागणार कि काय असच वाटतंय, कारण आपल्या किमान गरजा इतक्या भरमसाठ वाढल्यात कि पोटासाठी शेजारच्यांच्या घरातली साखर पण कमी गोड वाटायला लागली, स्वाववलंबन आणि श्रमनिष्ठा हे फक्त आता व्यक्तिमत्व विकासाच्या पुस्तकातील धडेच राहणार बहुतेक. या मॉडर्न जगात शस्रात्मक साधनांचा वापर कमी तर विचारांच्या लढाईतील शब्दांची AK47 आणि विरोधाचे रणगाडेच युद्धासाठी वापरले जातायेत. जो तो आपल्या पाठींब्यासाठी अशा प्रकारच्या मॉडर्न चाणक्यनितीचा वापर करताना त्याचा शिकार / विरोधी म्हणून आप...