डॉ.आंबेडकर युगपुरुष - देवपुरुष नाही....



गेल्या अनेक वर्षापासून डॉ. भीमराव आंबेडकर हे नाव थोर समाजसुधारक आणि युगपुरुष म्हणून ऐकत होतो, आज प्रत्यक्षात त्यांच्या विषयी काही लिहिण्याचा योग आला. त्यांच्याविषयी खूप काही अभ्यास नाही पण साध्या आणि सामान्य माणसाला गवसलेला हा व्यक्ती मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आयुष्यात समाज हितासाठीची केलेली अनेक कामे चौदार तळं, काळाराम मंदिर, असपृश्यता निर्मूलन, लोकशाहीचे संविधान, आणि अनेक कामे केलेल्या या महापुरुषाला वंदन करून लेखास सुरुवात करतो.

सिद्धार्थाच्या आयुष्याचे दोन अस्तित्व होते, एक म्हणजे समाज हिताचं आणि दुसरं राष्ट्र संरक्षणाचं, कि   ज्यात त्यांनी समाज हितासाठी समाज कार्य करणाऱ्या आणि समाज परिवर्तन करणाऱ्या भिक्षुकांचं अस्तित्व निवडलं आणि सिद्धार्थ बुद्ध झाले. अश्याच स्वरूपाचं अस्तित्व हे या युगपुरुषाचं आहे कि ज्यांनी समाजातील वेशिवरच्या कुष्ठरोग्याचं आयुष्य मिळालेल्या समाजाला पुन्हा सशक्त करण्यासाठी आणि समाज प्रवाहात आणण्यासाठी अतोनात कष्ट घेतले आणि एक नवीन स्थान या समाजालाच नव्हे तर इथल्या प्रत्येक व्यक्तीला मिळवून दिले.

अशा व्यक्तीला आपण एखाद्या समाजाचा देवपुरूष म्हणतो ज्याने फक्त एका समाजाचं नेतृत्व नाही तर राष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि लोकशाहीची पाळंमुळं या देशात खोलवर रुजवणारं संविधान मिळवून दिलं, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार आणि अस्तित्व मिळवून देईल असं काम केलं, तरी आपण त्यांना आज देवपुरुष म्हणून त्यांना देवाच्या रांगेत नेऊन बसवलं आणि त्याची पूजा अर्चा आणि भल्या मोठ्या साऊंड च्या भिंतींनी मिरवणूक काढतो, ज्याची त्या युगपुरुषाला काहीच गरज नाही. पण आपण त्यांना आणि त्यांच्या विचारांना बाजूला सारून त्यांना आपल्या करमणुकीचं आणि मनोरंजनाचं दैवत करून बसवलंय.

समाजात असलेली विषमता आणि दारिद्रय नष्ट करण्यासाठी आपल्याला अशा युगपुरुषाची आणि त्यांच्या वैचारिक कामाची खुप गरज आहे, आणि कदाचित या बुद्धपौर्णिमेच्या प्रसंगी समजात पसरलेला हा बुद्धिभेद नष्ट करून या युगपुरुषाला राष्ट्राचा प्रतिनिधी करणे आवश्यक आहे. त्याची पूजा न करता त्यांना एक मानवंदना म्हणून त्यांना आणि त्यांच्या विचारांना सर्व समाजात रुजवून अनेक समाज हिताचे बुद्ध निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित समाजातला एक आदर्श आणि सशक्त युवा हीच कदचित त्यांच्या कार्यास आदरांजली असेल.

शेवटी त्यांना समर्पित काही ओळी,

तनातनाला मनामनाला, उद्धारिले कोटी कोटी जणाला,
देशासाठी झटला जन्मभरी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो।...

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो...

Comments

  1. Neelam Pandit: Dr Babasaheb Ambedkar ya anchi tin upaasy dewate hoti - Vidya , Vinay aani sheel
    Vidye shiway maanwala shaantata nahi aani maanuskihi naahi.
    Vinay - bariastar zale, galelatth pagarachi nokari milali Asti , tarihi kanyacha bhaat aani kanyaachi bhakari khawun samajsewa karat raahile.
    Sheel- aayushyat kadhi dagabaaji, fasawnuk wa atmsiddhikarita paap kele naahi. Wideshaat astanahi kontahi wyasan laawun ghetala naahi.
    Ya tin gunaanmulech te uttung wyaktimatwaparyant pohchu shakale.
    Jya yugpurushyaane Sampurn Aayush saamajik annyay zaalelya samajaasaathi wechal tyala koti pranam
    Tuza blog 👍👍👍

    ReplyDelete
  2. Somnath Chadchane
    Barbor apala samaj ch mahapurshana pooja archa karnays survat kale ani taych aj tarunani tar be dund DJ song lavun tayanch vichar n pasravata manoranjan karat ahet.

    ReplyDelete
  3. Thoughtful msg...gr8 blog
    Onkar Rokade

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फायद्याचे बोला...।🙈🙉🙊

मॉडर्न चाणक्यनीती

शिक्षणाच्या आई-बाबा-चालक-मालकाचा घो...