शिक्षणाच्या आई-बाबा-चालक-मालकाचा घो...
लहानपणापासून चार भिंतींच्या चाकोरीत रडत-खडत बळजूबरीने शिक्षण घेत असल्याच्या अनुभव माझ्या बरोबर आपल्याला पण आला असावा, कि ज्यामध्ये भरमसाठ लिखाण , पर्वताएवढी भोकमपट्टी, नरकात भोगल्या जाणाऱ्या शिक्षा अशा अनेक पेचप्रसंगांना आपण सामोरे गेले असणार. अनेकदा अशा शिक्षणाच्या पिंजऱ्यात भविष्यातील पाळलेला पोपट म्हणुन बनून राहण्यापेक्षा या प्रवाहातून बाहेर पडून नवीन जलमार्गाच्या प्रवासासाठी निघालेले अनेक खलाशी जगाला अज्ञातच राहिले. कदाचीत काळाच्या ओघाने त्यातल्या काहींना जगासमोर आणण्याचं काम देखील काही लोकांनी करून त्यासर्वांच्या प्रयत्नांना मानवंदनाच मिळवुन दिली.
मधल्या काळात एक सिनेमा पण आला, अभिनेते श्री. भरत जाधव यांचा ज्यात आजकालच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती सध्याच्या शिक्षणाचा देवावर असलेल्या श्रद्धा-अंधश्रद्धेसारखा बाजार चालवला जात आहे आणि त्यात देवाला अर्पण केलेल्या बळीच्या प्राण्यासारखी दाखवली आहे. आणि अन्य प्रसंगातून आनखी बराच संदेश आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळे खोलात शिरत नाही आपणही सूज्ञ आहात.
सध्याच्या शाळा आणि त्यांना Seesaw सारख्या खेळात सतत खालचा दर्जा दाखवणारे कोचिंग क्लासेस ( ज्या ठिकाणी आपल्या पाल्यास काही न करता उत्तम यश सम्पादन करून देण्याची 100% Guarantee & blah blah...) असे चाचेगिरी करणारे चोर आपला खिसा Donation, Extra Fee, Guidance fee, blah blah... च्या नावाखाली गरम करत आहे. अश्या अनेक चोरांचे खिसे आणि कपडे फाडून त्यांचा बाजार बंद करण्याचं कामपण कदाकचित परग्रहावर राहणाऱ्या देवालाच अवतार घेऊन करावं लागणार कि काय असा प्रश्न मानला पडला.
शिक्षक आणि पालक हे तर म्हणजे डोळे झाकून आपल्या लंगड्या घोड्याला ( पाल्याला/ विद्यार्थ्याला ) आगीच्या रेसींग ट्रॅकवर मोकाट पाळायला सोडलेले नमुनेच म्हणावे लागतील. शिक्षक तर भरमसाठ विद्यार्थ्यांमध्ये कोणतेही कलागुण न वापरता निवांत पगार रवंथ करणाऱ्यांमधलेच झालेत, पण पूर्ण चूक त्यांची पण नाही सरकारी कामे, शासकीय सर्वे, प्रशिक्षण, प्रपंच ई अनेक कारणे आहेच त्यांनापण. पालक तर काय TV Serial मधल्या भूमिकांमध्येच अडकलेले त्यामुळे बोलयाला जागाच नाही. तरी अनेक पालक आणि शिक्षक याला अपवादच आहेत त्यांना बाजूला सारले तर मोठी संख्या असल्यांचीच...
गुरुकुल ऐकलेली एक जुनाट पध्द्त पण ऐकताच क्षणी आत्मसाद करावीशी वाटणारी ज्यामध्ये कलाप्रशिक्षण, आवडत्या विषयांचं कौशल्य संपादन करू देणारं विद्याशिक्षण, तंत्रकला, शस्त्र आणि त्यामागील शास्त्रशिक्षण, नीतिमूल्ये, संस्कार, स्वावलंबन, अनेक विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी निसर्ग सान्निध्यात शिक्षण घेणं अशी ती पद्धत लुप्त होता कामा नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आणि म्हणून तुम्ही आम्हीच विद्यार्थ्याच्या मनातील आणि स्वप्नातील शिक्षण उभारणी करण्याचे काम हाती घ्यावे, कारण कदाचित पुढच्या पिढीला आदर्श असे मूर्तिमंत देवाऐवजी आपणच आहात त्यामुळे शिक्षणाच्या मध्यमातुन पुढची सुजाण पिढी घडवणे पण आपल्याच हातात आहे. कलामांच एक वाक्य आहे, " Dream is not what you see in sleep, Dream is something which doesn't let you sleep unleash you fulfill it." त्याप्रमाणे उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढच्या पिढिला अशी स्वप्ने दाखवण्याचं काम आपल्या हाती आहे. त्यामुळे जागरुक विचारवंत बना आणि बदलाची स्वप्ने बघा.
SJ.
Comments
Post a Comment