फायद्याचे बोला...।🙈🙉🙊


प्रस्तावना
नमस्कार, आजकाल बातमी📺, वृत्तपत्रे🏭, social media💻, ते गल्ली-बोळ, कट्ट्यावरच्या गप्पापासून अगदी नळावरच्या भांडणाचा पण एकच विषय #Demonetization💰. अर्थातच लोकांची सहानुभूती😏 त्यांच्या फायद्याच्या विषयाबाबत नेहमीच लक्षणीय असते. असो हा प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे खोलवर न जाता थोड्या वास्तविक भूमिकेतून या निर्णयाकडे बघतो. तरी भारतीय👳 सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनाविषयी हा निर्णय नक्कीच ऐतिहासिक ठरणारा आहे अस वाटतं.🙌

सद्यस्थिती🔍
या निर्णयाच्या अंमलबजावणी नंतर सुरुवात झाली ती चर्चेला😰 आणि विरोधाला😱, स्वाभाविकच ज्यांच्या विरोधात हा निर्णय आहे त्यांना आकाश पाताळ😵 एक झाल्यासारखेच वाटले असणार, आणि उर्वरित त्यांचं मात्र जैसे थे वैसे।☺ सामान्य जनतेच्या वतीने आपली 'स्वार्थी😈/निस्वार्थी😇' बाजू मांडणाऱ्यांचा या मागील उद्देश तर काय त्या जनतेला अंगवळणी पडलेलाच नाही🙅. पण त्यांच मात्र एकला👍 एक👎 आणि दोनला👊 दोन👐 चालूच. यात सामान्य जनतेची मनस्थिती सर्कशीतल्या गोंधळलेल्या प्राण्यासारखीच🐒. (क्षमस्व प्राणी म्हणून उल्लेख केला म्हणून)

स्वाभाविक मानसिकता😳😖
अश्या वेळी ज्यांचा या विषयाला विरोध ते नक्कीच राजकीय दृष्ट्या मतांनी मार👊 खाणारे, ज्यांना प्रसिद्धी आकर्षण😎 आहे ते, ज्यांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा खूपच सुधारलेला आहे असे, आणि धार्मिक दृष्टया देवाचे बाजारीकरण कारणारे, अश्या गटातले प्रतिनिधी असावेत. आणि तरी देखील मुद्दा हा सामान्य जनतेच्या विरोधी 🆚 युद्ध💣 म्हणून समोर आणण्याचा काय हेतू, जी जनता कर जमा करून आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचा कर योग्य ठिकाणी न वापरला गेल्याने झालेली ही तुंबळ, आणि ती साफ करायची म्हणजे वेळ⌛ आणि संयम😤 तर लागणारच,जसा तुम्ही तुमच्या घराच्या साफ सफाईच्या वेळी ठेवता अगदी तसाच.

फायद्याचे बोला..🙌😁😏
तर शेवटी असच वाटतं की सामान्य जनतेला या सर्व सर्कशी विषयी माहिती आहे आणि ते आपल्या आयुष्यात देशहितासाठी नक्कीच योगदान🙋 देतील, फक्त त्यांना त्यांच्या फायद्याची गोष्ट पोहोचवणं गरजेचं आणि त्यातूनच तर सजग नागरिक समाज 👪 घडण्यास सुरुवात होईल, क्षमस्व यात कोणताही संदर्भ व उदाहरणे जोडली नाहीत कारण या विषयी माहिती चर्चा मधून बाहेर आलेली आहेच फक्त या विषयी सामान्य व्यक्तीची 👳👩👨भूमिका बाहेर येणे खूप महत्वाचे आहे. कारण इथे सामान्य माणसाच्या मतांना☝ खूप मोलाची किंमत आहे.

धन्यवाद.🙏💐


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मॉडर्न चाणक्यनीती

शिक्षणाच्या आई-बाबा-चालक-मालकाचा घो...