सृष्टीचे मित्र आम्ही..🚲🤞😊


बऱ्याच दिवसांनी शाळेतून सायकलींवर मुलांना बाहेर जाताना पाहिले, आणि भविष्याची एक झलक म्हणून पुढील काही वर्षात कदाचित ही सायकल वर येणारी मुले पिप पिप भुर्र भुर्र करणाऱ्या गाड्यांच्या रांगा घेऊन येताना दिसली. नको, असं विचार करूनच शहारून आले आणि दुसऱ्याच क्षणी परिणामांचा विचार करून शब्द फुटले.

सध्याच्या काळात सायकलीं खुप तुरळक दिसतात, आणि त्यांची आवड जोपासणारे तर दुर्मिळच. पण काय माहीत अजूनही सायकल चालवीत मनसोक्त फिरावे असेच वाटते, अगदी पदव्युत्तर शिक्षण मिळवण्या पर्यंत सायकल चालवली, अगदी शेकडो मैलांचे अंतर देखील अविस्मरनिय रित्या पार केले, कदाचित त्यामुळेच त्या प्रेमापोटी आज याविषयी लिहावेसे वाटले.

काही वर्षांनी ही सायकल इतर ऐतिहासिक वस्तू प्रमाणेच प्रदर्शनात दाखवली जाईल की काय याची भीती नकोशी वाटतीय, पण आज मुलांना शाळेतुन सायकल वर जाताना खूप आनंद वाटला, आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तरी या वस्तू लुप्त होणार नाहीत हे समजून भीती नाहीशी झाली.

आणि म्हणून १० फ या चित्रपटातील मला आवडते गाणे आठवून सायकल शेवटच्या श्वासापर्यंत चालवण्याचा संकल्प केला. सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे, ओठांवर झेलूया थेंब पावसाचे (सायकल चालवताना).


शुभम😊🚲🚲🚲💧⛈️



Comments

Popular posts from this blog

फायद्याचे बोला...।🙈🙉🙊

मॉडर्न चाणक्यनीती

शिक्षणाच्या आई-बाबा-चालक-मालकाचा घो...