Posts

Featured Post

स्व-रूपदर्शन महाशिबिर सेवेकरी निर्माणाचा महायज्ञ

Image
परिसरातल्या अणुरेणूतुन अविरत वेचुनी तेजाचे कण, रसगंधाशी समरस होऊनि हृदयकमल फुलवावे,  विकसित व्हावे अर्पित होऊनि जावे ।। स्व. किशाभाऊ आणि त्यांच्या सवंगड्यांना वर्धिनीचा हा वटवृक्ष उभा करताना कधी पाहिले नव्हते, पण त्यांनी घडविलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सहवासातून त्यांच्या संस्कारांची, सत्कार्याची आणि समर्पणाच्या ऊर्जेची प्रचिती नेहमीच अनुभवायला येत होती. निस्वार्थ निष्काम कर्मयोग या शब्दांचा प्रत्यक्ष अनुभव देणारे अनेक उपक्रम वर्धिनीच्या सहवासात होत असतात. त्यापैकीच आयुष्यातील अविस्मरणीय उपक्रम म्हणजे स्व-रूपदर्शन महाशिबिर, जिथे लहानांपासून वृध्द कोणत्याही पदाचा, विचाराचा, मनाचा भेद न बाळगता सह कुटुंब नांदत होती. या शिबिराचा महाशिबिर प्रमुख म्हणून काम करण्याची संधी वर्धिनी आणि देवाने दिली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. शिबिराविषयी सहवास, शिक्षण, संस्कार, सेवा, संघटन, समर्पण या आयामांमध्ये मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न.   सहवास शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप,  शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी. रयतेचा राजा असे प्रेरणादायी चरित्र प्रत्यक्ष जगण्यासाठी शिबिराची नि...

उसने हसना सिख लिया था

Image
  12 वी फेल चित्रपट 2 वेळा पाहिला आणि पुन्हा लिहावेसे वाटले. कागज पे पिरोये स्याही ने रोके लिख दिया था हर पाडाव या मुकाम पे उसने हसना सिख लिया था चाहे कितने ही तुफान या बीजलीके घने बादल मंडराये भलेही धरती चीरके तप्त लावारस बाहर उमड आये  फिर भी उसकी नौका को समंदरने सहारा दिया था हर पाडाव या मुकाम पे उसने हसना सिख लिया था सब समझ मेहसुस ना करे दिखावे की बवालो में गिरते संभलते चलते है सभी उजाले के अंधेरे में खोके सब कूछ इंसानियत निभाने का एक वादा किया था हर पाडाव या मुकाम पे उसने हसना सिख लिया था यादों को डटोले पहेली सुलझाते चले सभी मुस्कुराते हर कदम हार ना मानेंगे अब कभी किसी गैरको बचाने के लिये बलिदान का जहर पिया था हर पाडाव या मुकाम पे उसने हसना सिख लिया था कही अधुरे ना रहे खवाब किसिके इस लिये जुटे रहे लीखे अनगिनद शब्द पर बिखरनेकी खामोशी से मिटे रहे आसुओंसे कागज और स्याही का हिसाब चुकता किया था हर पाडाव या मुकाम पे उसने हसना सिख लिया था - शुभम

🕉 राष्ट्राय स्वाहा 🕉

Image
देशभक्ती,  हा आमचा स्वभाव असला पाहिजे,  आमच्या रक्ताचा रंग असला पाहिजे,  आमच्या श्‍वासाचा स्वर असला पाहिजे! या चारित्र्यामूळे ब्लॉगचे नाव बदलावेसे वाटले।

बघतो.. शिक्षकांशी बोलून!!

आज मी एका आकाशला बदल स्वीकारताना आणि स्वतःला बदलताना अनुभवलंय, हो खरच.. सांगतो नेमके काय झाले ते. एका प्रवाश्याला लिफ्ट देण्याच्या निमित्ताने का होईना पण त्याला सोडायचे म्हणून संविधान चौक, वानवडीत थांबलो. तेवढ्यात रस्त्याच्या बाजूला एक आई आणि तिचा मुलगा, गाडीच्या चाकाजवळील गार्डला कव्हर लावताना दिसले आणि माझ्याही गाडीला लावावे म्हणून बोललो. तिथे मी भेटलो आकाश आणि त्याच्या कष्टाळू आईला. नेहमीच्या सवयीनुसार काम करताना मी त्याला त्याचे नाव विचारले? आणि लगेचच पुढचा सवाल केला 'शाळेत जातोस का?'. तो म्हणाला मला सर्व काही येते म्हणून शिक्षकांनी मला शाळेत घेतले नाही आणि मी देखील त्यांना परत विचारले नाही. हे बोलल्यावर मला समजले त्याला नक्की काय म्हणायचे होते ते पण तितक्यात तो म्हणाला 'माझ्या वयाच्या इतर मुलांना शाळेत जाताना बघितले की मलाही शाळेत जावे असे वाटते, पण नाही जात.' बोलता बोलता मी लगेचच त्याला बोलून गेलो, 'एकदा जेवलो की भूक भागते का?' त्याचा चेहरा आश्चर्यचकित दिसला, कदाचित त्याला ते उदाहरण पटले असावे, म्हणून मी त्याला आणखी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,...

इंसाफ की डूबती नौका

Image
इंसाफ की डूबती नौका इन दिनों बेचिराग कर रोती रहती है दुनिया, संविधान की मौजूदगी में देशको अंधेरे मैं झोंक दिया, कई घायल किये तो कई अपनोकों भूल गए, इंसाफ की डूबती नौका मैं निर्दयता का झूला झूल गए। (जो खण्डित भारत चाहते है) उन्होंन्हें बिछा दिए काटें कई, चुभे उन्हें जिन्हें सुरक्षा नसीब न हुई, उन्होंन्हें दिखाया पत्थरों से बदला कैसे लिए, की अंधेरे में अपने सगोंके उजालेंको हम भूल गए। क्या पता क्यों उन विदेशियों से मुल्खको आझाद किया, देशकी अंखडता के कारण जुल्मका घाव अपने सीने पे लिया, देश की सुरक्षा के लिये अपना जीवन कुर्बान किया, उन्हें भुल हम फिर विदेशियों के इरादों पे फिसल गए। बता दो अब क्या इतिहास दोहराने से जीत गए, उजाड़कर अपनो की दुनिया जीना सीख लिए, बदले से ही मनःशांती होगी पूरी इन विचारों पे डट गए, अपने अस्तित्व के अंहकार मैं देशके तुकडे कबूल कर लिए। -शुभम जगताप©

सृष्टीचे मित्र आम्ही..🚲🤞😊

Image
बऱ्याच दिवसांनी शाळेतून सायकलींवर मुलांना बाहेर जाताना पाहिले, आणि भविष्याची एक झलक म्हणून पुढील काही वर्षात कदाचित ही सायकल वर येणारी मुले पिप पिप भुर्र भुर्र करणाऱ्या गाड्यांच्या रांगा घेऊन येताना दिसली. नको, असं विचार करूनच शहारून आले आणि दुसऱ्याच क्षणी परिणामांचा विचार करून शब्द फुटले. सध्याच्या काळात सायकलीं खुप तुरळक दिसतात, आणि त्यांची आवड जोपासणारे तर दुर्मिळच. पण काय माहीत अजूनही सायकल चालवीत मनसोक्त फिरावे असेच वाटते, अगदी पदव्युत्तर शिक्षण मिळवण्या पर्यंत सायकल चालवली, अगदी शेकडो मैलांचे अंतर देखील अविस्मरनिय रित्या पार केले, कदाचित त्यामुळेच त्या प्रेमापोटी आज याविषयी लिहावेसे वाटले. काही वर्षांनी ही सायकल इतर ऐतिहासिक वस्तू प्रमाणेच प्रदर्शनात दाखवली जाईल की काय याची भीती नकोशी वाटतीय, पण आज मुलांना शाळेतुन सायकल वर जाताना खूप आनंद वाटला, आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तरी या वस्तू लुप्त होणार नाहीत हे समजून भीती नाहीशी झाली. आणि म्हणून १० फ या चित्रपटातील मला आवडते गाणे आठवून सायकल शेवटच्या श्वासापर्यंत चालवण्याचा संकल्प केला. सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे...

अहो चहावाले...

Image
अहो चहावाले... कशाला त्रास देताय या अजाण बेलगाम जनतेला, लाखोंच्या मालक मजदूर स्वभावाने अनैतिक घनतेला, आज काल कोणी पण उठतोय आणि आपला देशभक्तीचा शिक्का तुम्हाला बदनाम करून राखतोय...अहो चहावाले... तुम्ही भाषणे देता बोलून दोस्तहो-देशभक्तहो..!, आम्ही मात्र आरोळतो 'भाई तुम देर दुरुस्त रहो।', तुम्ही कशाला उद्याची उधाण स्वप्न बरळता, सध्याचा तरुण स्वतःला व्यसनांच्या गर्दीत दिसतो खिदळता, देशाचा काय भलं ते तुमचं तूम्ही बघा, आम्हाला आमच्या मनोरंजनाचे देऊन तूम्ही कसेही जगा, कशाला देशाची सुख दुःखे गाता वाया "मन की बात", आम्ही झोपतो उशाशी तूम्ही जागा दिवस रात, अहो देशाच्या संरक्षणाचे काम करत असतील शिपाई, आमच्यात नाही ताकद देशातील तरुण सळसळते रक्त आटत जाई, आमच्या वेदना तुम्हाला काय कळणार, तुमच्या वेदनांची किंमत आम्ही मात्र तुम्हाला ठेचून वगळणार, अहो चहावाले... अहो आमच्या शेतकरी बापाची आम्ही पुण्यवान लेकरे, लाखोंचा सूट घालुन त्याच्यासाठी तुम्हीमात्र अहोरात्र घाम गाळीत फिरे, अहो आम्ही आपले सुखी आहोत 4 पायांच्या खुर्चीत, देशापेक्षा जास्त महत्त्वाच्या परश्या आण...